जय गजानन.. आनंदाचा दिवस ..
आज मार्गशीर्ष.. प्रथम गुरुवार.. देव दीपावली ..☺️☺️☺️🌷🌹 आज दिनी 21 वर्षां पूर्वी गुरुदेवांना समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज.. आणि महाबली प्राणदाता हनुमंत स्वामी महाराज.. साक्षात रांमप्रभू यांनी जगत कल्याणासाठी संन्यास व्रत स्वीकारण्याची आज्ञा केली .. राम कार्य जबाबदारी आपल्या श्री गुरूंवर सोपविली.... किती कौतुक करावे तेवढे कमी आहे .. किती अभिमान वाटावा आपल्या गुरूंचा आपल्याला... 😇😇😇
संन्यास सारखे व्रत तेही सर्वस्व त्याग करून जगाच्या कल्याणा अखंड धारण करणे ..हे व्रत स्वीकारले धाडसाने आपल्या गुरूंनी हा क्षणच देवांसाठी दिवाळीचा असतो 😃😃🤩🤩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आणि आज दिनी ठाणे येथे नूतन केंद्र उदघाटन होते आहे हे खूपच आनंदाचे आहे.. आणि राम कार्याची आणि समाज कल्याणाची ही सुंदर संधी त्यांनी आपल्या सगळ्यांनाही दिलेली आहे .. हे किती भाग्य आपले... आपणही विविध प्रकारे या राम कार्यामध्ये हातभार लावून सहभाग घेऊन देवतांना आनंद निश्चितच देऊ शकतो ..
आपल्या गुरुदेवांवर खूपच मोठी जबाबदारी आहे ..त्यामुळे आपण गुरुदेव म्हणतील त्यानुसार सर्व कार्य करणे .. गुरुदेवांची सेवा करणे .. काळजी घेणे त्यांची हेच आपणा सर्व शिष्यांचे आद्य कर्तव्य, धेय आहे आणि आजचा दिवस आपण खूप जल्लोषात साजराही करणार आहोत 😃😃😃😃 जगत कल्याणासाठी आणखीन एक स्थान हनुमंतांनी सुरू केले आहे .. 😃😃 कपिकुळ कार्य... गुरुदेव ज्ञान .. मोक्ष मुक्ती सुवर्ण संधी ... राम कार्य घरोघरी.. गावोगावी .. मनोमनी पसरावे नी वाढता वाढता वाढे भेदीले शून्य मंडळा.... असे हे कपीकुल चे कार्य सूर्य मंडळ भेदून जावे, आणि प्रत्येकाला या कपिकुल आणि गुरुदेवांच्या छत्रछायेखाली सेवेमध्ये रममाण होण्याची बुद्धी आणि इच्छा व्हावी ही आज दिनी श्री हनुमंता चरणी प्रार्थना....
🌷 उत्तराधिकारी कृष्णमयी ☺️☺️☺️☺️☺️☺️🌹🌹🌹🌹
Comments