बद्दल
मानवी रोगांच्या चिकित्सेकरिता फक्त नैसर्गिक साधनांचा उपयोग करणे म्हणजे निसर्गोपचार.
शरीर-मन-आत्मा ह्यांचे उत्तम संयोजन म्हणजे आरोग्य. एक सुखी आणि निरोगी व्यक्ती म्हणून सुंदर जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे निसर्गोपचार. निसर्ग मानव जातीला देणगी आहे. आपणसुद्धा निसर्गाचा अविभाज्य घटक आहोत.
महान संत - श्री समर्थ रामदास स्वामी, श्री श्री गजानन महाराज ह्यांनी लोकांना सांगितले आहे "आरोग्यम धनसंपदा". जर आपल्याकडे निरोगी शरीर आणि सुंदर मन असेल तर जीवन सुखमय होऊन आयुष्यात यशप्राप्ती होते. हे साध्य करण्यासाठी आपण पंचसूत्रीचा अभ्यास केला पाहिजेः
योग - प्राणायाम - पौष्टिक आणि संतुलित आहार - नैसर्गिक दिनचर्या - ध्यान
हे लक्षात घेऊन कृष्णमई यांनी कपिकुल सिद्धपीठम येथे कपिकुल निसर्ग चिकित्सा केंद्राची स्थापना केली - हे महाराष्ट्रात नाशिक येथे गोदावरी नदीच्या काठी वसलेले एक दिव्य व स्वर्गीय स्थान आहे.
कृष्णमई: कपिकुल सिद्धपीठमच्या उत्तराधिकारी - एक कर्तृत्ववान योग आणि निसर्गोपचार गुरु. त्यांच्या परीसस्पर्शा मुळे अनेक आरोग्यविषयक आजार बरे होण्यासाठी नैसर्गिक औषधांचा आणि उपचाराचा स्वतःचा फॉर्म्युला विकसित करण्यासाठी तिने नैसर्गिक विज्ञान आणि पुरातन वैदिक शहाणपणाचा अभ्यास केला आहे.
त्यांनी नैसर्गिक विज्ञान आणि प्राचीन वैदिक शास्त्रांचा सखोल अभ्यास करुन स्वअध्ययनानी अनेक आरोग्य समस्यांवर उपचार पद्धती तयार केली आहे.