top of page
Search

दासनवमी उत्सव २०२२ | Dasnavmi Utsav 2022

दासनवमी उत्सव बातमी


दासनवमी निमित्ते नूतन समर्थ मूर्ती ची आज स्थापना व उदघाटन करण्यात आले । तसेच आज पासून सर्वांना येथे कुबडी तीर्थ लाभ ही घेता येणार आहे । रोबोटिक ऑटोमेशन द्वारे आपला तळहात कुबडी जवळ नेताच तीर्थ ऑटोमॅटिक पद्धतीने लगेच मिळणार ।

संकल्पना गुरुदेव वेणाभारती महाराज व उत्तराधिकारी कृष्णमयी । ऑटोमेशन रोबोटिक्स इंजिनिअर पराग सेवेकरी ।


श्रीकपिकुल सिद्धपीठम नाशिकतर्फे दरवर्षी प्रमाणे 1008 श्रीमहंत तपोमुर्ती सद्गुरू श्रीवेणाभारती महाराज यांच्या दिव्य उपस्थितीत दासनवमी उत्सव साजरा करण्यात आला.


🌹भारतभर तीन लाखांहून अधिक अध्यात्मिक प्रवचने व्याख्याने करून धर्मप्रसार जनकल्याण कार्य करणाऱ्या परमहंस सद्गुरू कपिकुल आश्रम पिठाधिश्वरी श्रीवेणाभारती महाराज यांच्या संन्यस्त झोळीतील दिव्य भिक्षेचा लाभ हजारो भाविकांनी घेतला । गुरुदेव अखंड सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत उशिरापर्यंत येणाऱ्या प्रत्येक भक्ताला स्वतः हाताने धान्य वाटप करीत असतात । कित्येक टन धान्य आज वाटप केले जाते । व अत्यंत पुण्यदायी अश्या भिक्षेचा लाभ गेली अनेक वर्षे श्री गुरुदेव भक्तांना करवून देत आहेत ।

या वर्षीचे विशेष महत्त्व म्हणजे कपिकुल या टेक्नो स्पिरीचूअल आश्रमात गुरुदेव व कृष्णमयी यांच्या संकल्पनेनुसार नूतन

समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सद्गुरु वेणाभारती महाराज व उत्तराधिकारी श्रीकृष्णमयी यांच्या हस्ते करण्यात आली।

या वेळी कुबडी तीर्थाचे रोबोटिक्स तंत्रज्ञानाद्वारें ऑटोमेशन करण्यात आले आहे व या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कुबडी तीर्थाचा लाभ सर्व भाविकांना प्राप्त झाला । अध्यात्म व विज्ञानाचा अनोखा संगम येथे साकारला आहे। श्री गुरुदेवांचे शिष्य रोबोटिक्स इंजिनिअर पराग सेवेकरी यांनी या अनोख्या टेक्नॉलॉजी द्वारे हे तीर्थ भक्तांना मिळेल अशी योजना केली आहे ।


यंदाच्या वर्षीचे विशेष म्हणजे सर्वांना या

आता सर्वांना या कुबडी तीर्थाचा लाभ दररोज खुला करण्यात येणार आहे ।


या वेळी अभिनेत्री ऋता दुर्गुळे यांचे आई वडील, पनवेल चे प्रसिद्ध वकील श्री राजेंद्र देशमुख सर , पुण्यातील प्रसिद्ध पत्रकार श्री विजय अंबाडे सर हे उपस्थित होते ।


कार्यस्थळ: श्री कपिकुल सिद्धपीठम, मुठे लेन, कपालेश्वर मंदिराजवळ, पंचवटी- नाशिक

संकेत स्थळ । www.kapikul.com

संपर्क:8208362950



Commentaires


bottom of page