सुवर्ण संधी गुरुदर्शनाची.......🙏
लवकरच ठाण्यात आपल्या गुरुदेवांचे स्थान .. कपिकुल चे नवीन केंद्र होत आहे 😃त्याच्या उदघाटन सोहोळ्यास गुरुदेवांचे व कृष्णमयिंचे ठाण्यात आगमन होणार आहे .......🌸🌸🙏
हरि ओम
नमो गुरवे वासुदेवय
सद्गुरु कृपेने अमित याने मित्र म्हणून मला आपलेसे केलय, अशा अमितच्या निवासी अनंत कोटी ब्रह्मांडनायक सद्गुरु गजानन महाराज आणि श्रीसमर्थांचे आणि चिरंजीव श्रीगरुड हनुमंताचे सूक्ष्म मात्र प्रभावी स्वरूपातील नित्य वास्तव्य असणार आहे, आणि सद्गुरु दीदी आणि तुम्ही स्वतः तिथे कायम त्यांचे सोबत प्रत्यक्ष आणि सूक्ष्मातील लहरींच्या द्वारे उपस्थित असणार आहात. हा तर मणी कांचन योगच म्हंटला पाहिजे.
संसारात रममाण झालेल्या माझ्या सारख्या असंख्य भक्तांना उद्धरण्या साठी ठाण्यामधील मित्र अमित त्याचे घर तुम्ही सद्गुरुंचे ठाणे म्हणून निवडले याचा निश्चितच आनंदच आहे. अगदी मनापासून आनंद आहे, अमित आणि परिवाराला सगुण सद्गुरूंच्या सेवेचा, सनिध्याचा, सहवासाचा लाभ मिळणार आहे. सत्याचा सहवास घडणार आहे आणि सत्याची कास धरत, ज्ञान ही मिळणार आहे, अशी परिपूर्ण सेवा करण्याची संधी सदगुरु दीदींनी कृपाछत्र धरल्यामुळेच मिळणार आहे. असा योग विरळाच असतो.
सद्गुरूंनी केंद्रासाठी एखाद्याची निवड करायची किंवा केली यातच सर्व काही आल आहे.
होऊ देत सुखी सारे,
सर्वां आरोग्य लाभू दे,
मांगल्य सर्व पहोत,
न कोणा दुःख होऊ दे.
ही प्रार्थना करत, तुम्हा सर्वांना ह्या केंद्रासाठी खूपखूप शुभेच्छा आम्ही दोघेही देतो.
सद्गुरु दीदींच्या चरणी सविनय साष्टांग नमस्कार करतो.
सद्गुरु कृष्णमयिंच्या चरणी सादर नमस्कार करतो.
या केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित रहायला नक्कीच आवडेल. निमंत्रण पाठविल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. येण्याचा जरूर प्रयत्न असेल.
हरि ओम.
नर्मदे हर
Komentáře