top of page
Search

7 दिवसांचा स्वर्गीय भिक्षा फेरी सोहळा

7 दिवसांचा स्वर्गीय भिक्षा फेरी सोहळा.....😃😃😃😃😃😃🚩🚩🚩🚩🚩 भीक्षा फेरी झंझावात... गुरुदेवांचे संन्यासी झोळीत सहित सुंदर रोजचे दर्शन... त्या चरणांमागे भिक्षा फेरीत चालायला मिळाले, गुरुदेवांचे चालणे म्हणजे अंजनी तनय मारुती आला काय वाटे पुन्हा ... 😇😇😇😇असेच आपल्याला धावावेच लागते... त्या पावलांमागे धावणे चालणे अनुभवचं विलक्षण आनंद देणारा... हजारो जणांचा समुदाय पहाटेपासून गुरुदेव येण्याच्या तयारीला लागतो जानेवारी महिना हाच हृदयाची धडधड वाढवणारा असतो म्हणजे आनंदाने की गुरु येणार आहेत गुरुदेव आपल्या घराजवळ येणार आहेत त्यांचा दर्शन होणार आहे .. कसं स्वागत करूया यावेळी काय नवीन करूया ही सगळ्यांची धावपळ लगबग सुरू होते या वेळेला तर सर्वांनी मिळून खूप खूप सुंदर तयारी केली होती अख्ख्या सोसायटीच्या सोसायटी विभागच्या विभाग एकत्र येऊन जयत तयारी लोकांनी केली होती... ती गुरू दर्शन तळमळ.. स्वागताची तयारी ..पुष्पवृष्टी ...हजारो हजारो लोकांनी केलेलं स्वागत पूजन.. पाद्य पूजन.. औक्षण...हार फुल प्रसाद भिक्षा... खरंच स्वर्गीय सोहळा पृथ्वीवर गुरुदेवांमुळे सात दिवस अनुभवता आला सर्वानाच... गुरुदेवांची सेवा करण्याची संधी मिळाली आणि हजारो हजारो लोकांना देव दुर्लभ असा पुण्यालाभ गुरुदेवांनी करून दिला ...

कपिकुल मधले सर्वच सेवेकरी साधक तर सात दिवसच नव्हे तर अहोरात्र 24 तास आणि हे पूर्ण आयुष्य कपिकुल गुरुसेवा आणि राम कार्य सेवा करतच आहेत ..पण नाशिकच्या इतर सर्व सर्व सेवकरी मंडळींनी प्रचंड मेहनत घेतली ..सात दिवस सुट्ट्या टाकून सकाळी आठ ते दुपारी दोन भिक्षा फेरीला आणि संध्याकाळी सहा ते रात्री दहा प्रवचनाला उपस्थित होते सर्व सेवा करायला मदत करायला भिक्षा आवरायला भिक्षा तयारीला सगळ्याला नाशिक सेवेकरी परिवाराने खूपच सुंदर सहभाग घेतला.. छान सेवा केली ...


आज मात्र भिक्षा आवरायला घेतली गुरुदेवांनी कुठेही आराम नाही झोप नाही जमले नाही दुखणे नाही विश्रांती नाही जराही.... ते अजून मोठे काम असते असे गुरुदेव धन्य आहेत की ज्यांनी आज लगेच स्वतः ते आवरायाला घेतल आहे..

भिक्षेचा सर्व देवराम प्रभू हनुमंत स्वामी सीतामाता सन्मान करतात त्यामुळे ती लगेचच नीट जतन करणे स्वच्छ करणे महाराजांना ज्यांनी ज्यांनी भिक्षा घातली त्यांची निरोप पोहोचवणे त्यांना आशीर्वाद मिळवून देणे हे फार मोठे कार्य गुरुदेवांचे असते...पण खूप खूप मिस होत आहे सगळं आज ☹️😔😔😔रोजची धावपळ धडपड ... तयारी ..पुढे जाणं तयारी बघणं सगळ्यांची ... गुरु येणारेत गुरु येणार आहेत... हा आनंद ... वेड्यासारखे झंझावाती दिवस होते... पहाटे सहा ते रात्री दोन असं schedule 7 दिवस सलग.... तो झंझावात होता राम जागराचा... अध्यात्म जागराचा ...दुष्ट शक्तींचा निपात आणि सात्विक शक्तींचा उदय व्हावा यासाठीची ती परमेश्वराला केलेली सामुदायिक प्रार्थना असते... एक नवा ज्ञान सेतू रामसेतूच गुरुदेवांनी बांधला... बांधत आहेत ..

हे मानवी शक्तीच्या पलीकडच कार्य आहे ...ही केवळ सद्गुरु शक्ती पाठीमागे आहे म्हणून इतकं मोठं राम कार्य या कलियुगात घडू शकलं... घडू शकत आहे हजारो लोकांना गुरुदेवांनी दर्शन देणं आशीर्वाद देणं आनंद देणं हे भाग्य... आणि ही निस्वार्थ निस्पृह सेवा आणि या संन्यासी झोळीतले हे सर्व धान्य आता उत्सवांमध्ये अजून हजारो लाखो जणांच्या मुखात जाणार आहे ...संन्यासी झोळीतले हे धान्य असल्यामुळे त्या प्रसादाचा लाभ खूप वेगळा आहे ..गुरुदेवांनी सांगितलं की हे अन्न पोटात राहते ते नाश पावत नाही ... 13 फेब्रुवारीला नाशिक येथे कपि कुल येथे होणाऱ्या प्रगट दिन उत्सवात या भिक्षेच्या अन्नाचाच महाप्रसाद बनवला जाणार आहे ...बनवला जातो गेली बावीस वर्ष . . म्हणूनच प्रगट दिनाला हे भिक्षेचे अन्न जो जेवेल त्याला अमृतलाभ त्याच्या शरीराला होणार आहे.. हे रामप्रिय धान्य अन्न प्रसाद कायम आपल्या शरीरात निवास करणार आहे ... ते वाया जाणार नाहीये असे गुरुदेवांनी सांगितले...त्यामुळे या भिक्षेचा प्रसाद जेवण्याकरता प्रगट दिनाला 13 फेब्रुवारीला सगळ्यांनी सगळ्यांनी नाशिक येथे कपिकुल सिद्धपीठमला यायचेच आहे... कारण हा प्रसाद... वरती ही भिक्षा स्वतः रामराय व सीतामाता स्वीकारतात... ते स्वतः साधू संतांना या भिक्षेचे अन्न जेवू घालतात, या भिक्षेचे अन्न सेवन करण्यासाठी भिक्षा सोहळ्यासाठी सर्व देव साधू संत आतुर असतात आणि त्यांच्या हातचा हा लाभ प्रगट दिनाच्या महाप्रसादातून आपल्याला होणार आहे असं गुरूंनी सांगितला आहे आज वाईट वाटतंय की आज भीक्षा फेरी नाही... ☹️☹️ आता एक तारखेला पुण्यात कार्यक्रम ..दोन तारखेला तळेगाव मध्ये कार्यक्रम आणि पाच-सहा पनवेल ठाणे कार्यक्रम असा दौरा आहे आणि त्यानंतर लगेचच आठ दिवसात प्रकट दिनाचे उत्सवाचे जोरदार तयारी सुरू होईल सर्वांनी प्रगट दिनाला सेवेला उत्साहाने सहभाग घ्यायला महाप्रसादाला पालखी सोहळ्याला नक्की यायचे आहे राहण्याची जेवणाची सोय आश्रमात नक्की करू.... जय गजानन कृष्णमयी...

खूप बोलायचे आहे लिहायचे आहे पण किती लिहिणार हजारो फोटो काढलेले आहेत व्हिडिओ काढलेले आहेत आणि वेळात वेळ काढून घाई घाईत का होईना रोजच्या भिक्षा फेरीचे व्हिडिओ एपिसोड आपल्या लाडक्या कपीकुल यूट्यूब चैनल वर अपलोड केले आहेत सायंकाळचे प्रवचने देखील युट्युब वर शेअर केली आहेत सांगता सोहळा आणि त्याचा प्रवचन फार दिव्य झालेला आहे त्यामध्ये गुरुदेवांनी संपूर्ण भिक्षेचे महत्त्व झोळीचे महत्त्व सांगितल आहे त्यामुळे ते जरूर ऐका आपल चॅनल सबस्क्राईब करा आणि या सगळ्याचा आनंद घ्या😇😇

bottom of page